इस्रो चा स्पेस डॉकिंग यशस्वी: भारताने इतिहास रचला
मुंबई, 17 जानेवारी 2025
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) ने आज भारताच्या अंतराळ क्षेत्रात आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. SpaDeX (Space Docking Experiment) यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून भारत चौथा देश ठरला आहे, ज्याने हे मोठे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.
इसरोने एका ट्विटद्वारे यशाची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, “डॉकिंग प्रक्रियेतून 15 मीटर अंतरावरून 3 मीटरच्या होल्ड पॉईंटवर जाण्याचा प्रक्रिया अत्यंत अचूकतेने पार पडली. त्यानंतर यशस्वीरित्या डॉकिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली. रिट्रॅक्शन व रिगिडायजेशनही यशस्वीरीत्या पूर्ण झाले आणि स्थैर्य मिळवण्यात आले.”
हा यशाचा क्षण भारतासाठी अभिमानास्पद असून, जागतिक स्तरावर भारताच्या अंतराळ संशोधनाची ताकद सिद्ध करतो. स्पेस डॉकिंगच्या क्षेत्रात अमेरिका, रशिया, चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे.
इसरोच्या या ऐतिहासिक यशासाठी संपूर्ण देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताची ही प्रगती जागतिक पातळीवरील स्पर्धेत भारताला पुढे नेईल, याची खात्री आहे.
माझा आवाज या अभिमानास्पद घटनेसाठी इसरो व त्याच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन करते.
https://x.com/MeghUpdates/status/1879758998506963058
अशाच अधिकृत व महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचे न्यूज पोर्टल ‘माझा आवाज’ व आमचे सोशल मीडिया हँडल्सला जरूर फॉलो करा!









