Home » बातम्या » मंत्रालयात फेरबदलाची लाट: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्या जाहीर

मंत्रालयात फेरबदलाची लाट: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्या जाहीर

Facebook
X
WhatsApp
Telegram

मंत्रालयात फेरबदलाची लाट: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्या जाहीर

माझा आवाज प्रतिनिधी मुंबई 

दिनांक: 31 डिसेंबर 2024, मुंबई

महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनाच्या विविध स्तरांवर बदलांचा प्रवाह सुरु आहे. आज महाराष्ट्र शासनाने अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीसाठी आदेश जारी केले आहेत. या बदलांमुळे शासनाचे कामकाज अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे.

प्रमुख नियुक्त्या आणि पदोन्नती:
  • सचिनद्र प्रताप सिंह यांची आयुक्त, शिक्षण पुणे येथे नियुक्ती करण्यात आलीय.
  • रुचेश जयवंशी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ते सध्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियान, नवी मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणन कार्यरत होते. त्यांना अल्पसंख्यांक विभास विभाग, मंत्रालय मुंबईचे सचिव पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
  • रविंद्र बिनवडे हे नोंदणी महानिरीक्षक व नियंत्रक मुंद्राक शुल्क, पुणे या पदावर काम करतील.
  • रणजितसिंह देओल यांची प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • डॉ. अशोक करंजकर, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • डॉ. प्रशांत नारनवरे यांची सचिव व विशेष चौकशी अधिकारी (२), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.महिला व बाल विकास विभाग, पुणे चे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
  • सूरज मांढरे यांची आयुक्त कृषी, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी क्रीडा व युवक सेवा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते.
  • प्रदीप पी. यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
  • माणिक गुरसाळ यांना सध्याच्याच पदावर ते पद अधिकालिक वेतन श्रेणीत उन्नत करून पुढे ठेवण्यात आलं आहे. माणिक गुरसाळ यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
  • सोनिया सेठी सध्या महसूल व वन विभाग, मंत्रालय येथे प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन) म्हणून कार्यरत आहेत त्यांना अपर मुख्य सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
  • आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे.
  • समग्र शिक्षा अभियान, मुंबईच्या राज्य प्रकल्प संचालक विमला आर यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे.
  • शीतल तेली-उगले, सोलापूर महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्त पदावर वेतनश्रेणी उन्नत करुन पदोन्नती देण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक ए. बी. धुळाज यांना वेतन श्रेणी उन्नत करुन पदोन्नती देण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त, अन्य अनेक अधिकाऱ्यांना वेतन श्रेणीत सुधारणा व पदोन्नती मिळाल्या आहेत. बदल्यांची ही प्रक्रिया प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारक बनवण्यासाठी केली जात असल्याचे शासनाने सांगितले आहे.

प्रशासनातील गतिमानता वाढवण्याची तयारी

नियुक्ती व बदल्यांमुळे प्रशासकीय सेवा अधिक प्रभावी होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

‘माझा आवाज’ वर मिळवा महाराष्ट्रातील घडामोडींचे ताजे अपडेट्स!
ताज्या बातम्या, विश्लेषण, आणि अधिक माहितीसाठी आमच्या ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला भेट द्या. तसेच, आम्हाला Facebook आणि इतर सोशल मीडिया हँडल्सवर फॉलो करा.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!