Home » क्राइम » संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण

संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण

Facebook
X
WhatsApp
Telegram

संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण

माझा आवाज वृत्तसेवा 

28 डिसेंबर 2024, पुणे 

राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आले. सरेंडर होण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये त्यांनी आपल्यावर खोटी फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे.

व्हिडिओत कराड म्हणाले, “केज पोलिस स्टेशनमध्ये माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, मी सीआयडी कार्यालयात सरेंडर होत असून तपासात पूर्ण सहकार्य करणार आहे. जर मी दोषी आढळलो, तर न्यायालय जो निकाल देईल, तो मान्य असेल.

राजकीय आरोप-प्रत्यारोप

या प्रकरणावरून राज्यात मोठा राजकीय गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर गंभीर आरोप करत कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, “एका सरपंचाचा अपहरण करून खून होतो आणि आरोपींना संरक्षण दिलं जातं, हे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचं अपयश आहे.”

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड म्हणाले, “वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे. त्यांना राजकीय पाठबळ मिळालं असल्यामुळेच तपासात अडथळे येत आहेत.”

सरकारची भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्द केला आहे. त्यांनी आश्वासन दिलं की दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. यासंदर्भात सीआयडीने कराड यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

संतोष देशमुख हत्येचा तपास वेगाने सुरू असून आणखी काही आरोपींवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राजकीय नेत्यांच्या सहभागाचीही चौकशी होणार आहे.

माझा आवाज वाचकांना विनंती:

अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी, आमच्या ‘माझा आवाज’ या मराठी न्यूज पोर्टलला फॉलो करा. तसंच, आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही आम्हाला जॉइन करा.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!