दक्षिण कोरियात बोईंग 737-800 विमानाच्या लँडिंग गिअरच्या बिघाडामुळे जीवघेण्या दुर्घटनेत 179 जणांचा मृत्यू
30 डिसेंबर 2024,
दक्षिण कोरियातील जेजू एअरच्या बोईंग 737-800 मॉडेल विमानाला लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यानंतर कथित बर्ड स्ट्राइक मुळे कालच्या भीषण विमान अपघाता 179 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
कालच्या दुर्घटनेत जेजू एअर फ्लाइट 2216 विमानाने थायलंडहून दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेली-लँडिंग करताना आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातात सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले, तर आश्चर्यकारक रित्या केवळ दोन फ्लाइट अटेंडंट वाचले.
आज सकाळी जेजू एअरच्या आणखी एका फ्लाइटला गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जेजूकडे निघाल्यावर काही वेळातच लँडिंग गिअर बिघाडाचे संकेत मिळाले. पायलटने तत्काळ माघारी फिरून विमान सुखरूपपणे जमिनीवर उतरवले.
सरकारी तपास सुरू
दक्षिण कोरियन सरकारने देशातील सर्व बोईंग 737-800 मॉडेल विमानांची विशेष तपासणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकन विमान निर्मिती कंपनी बोईंगच्या अधिकाऱ्यांनाही तपासात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
विमानतळावरील सुरक्षा उपायांविषयी प्रश्नचिन्ह
कालच्या अपघातात विमान रनवेवरून घसरत जात कंक्रीटच्या भिंतीला धडकले. अनेक तज्ञांनी विमानतळावरील भिंतीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “ही भिंत नसती तर अपघात टाळता आला असता,” असे मत विमान सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केले.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
या दोन घटनांनंतर जेजू एअरच्या तिकिटांची मोठ्या प्रमाणावर रद्दीकरणे झाली आहेत. प्रवाशांमध्ये सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता निर्माण झाली आहे.
दक्षिण कोरियाच्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. यापुढील काळात अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना अपेक्षित आहेत.
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स मिळवण्यासाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्सला नक्की फॉलो करा.
दक्षिण कोरियात बोईंग 737 विमानाच्या लँडिंग गिअरच्या बिघाडामुळे जीवघेण्या दुर्घटनेत 179 जणांचा मृत्यू

mazaawaaz
Author
महत्वाच्या बातम्या
अजितदादांना बारामतीत शासकीय निरोप. 🥀
इम्रान खान यांना 17 वर्षांची शिक्षा ⚖️
🚨 जाफराबाद गोळीबार: दोन भावांचा मृत्यू 🔫
⚡ सावळज ग्रामपंचायतीत राजीनामा सत्र 🔥
🚨दिल्लीतील वाहन चोरीत ५२% झपाट्याने वाढ! 🚗
🙏 शीला दीक्षित यांना काँग्रेसची श्रद्धांजली 🌹
Stock market