Home » बातम्या » काँग्रेस नेते राजीव मोरे यांचे वडील काळाच्या पडद्याआड”

काँग्रेस नेते राजीव मोरे यांचे वडील काळाच्या पडद्याआड”

Facebook
X
WhatsApp
Telegram

“काँग्रेस नेते राजीव मोरे यांचे वडील काळाच्या पडद्याआड”: उद्या दि. २७ डिसेंबर रोजी रक्षाविसर्जन 

तासगांव , २६ डिसेंबर २०२४

माझा आवाज प्रतिनिधी तासगाव

बिरणवाडी (ता. तासगाव) येथील ज्येष्ठ नेते नेताजी कृष्णा मोरे (वय ७०) यांचे २५ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काँग्रेसचे युवा नेते आणि अग्रणी फाउंडेशनचे संस्थापक राजीव मोरे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनामुळे मोरे कुटुंबाचा आधारवड हरपला आहे.

नेताजी मोरे यांची ओळख एका कष्टाळू शेतकरी, कुस्ती क्षेत्रातील तज्ज्ञ, बैलगाडा शर्यतीचे जाणकार आणि पुरोगामी विचारांचे राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून होती. बिरणवाडीच्या माळरानावर त्यांनी फुलवलेली द्राक्ष शेती आणि निर्यातक्षम उत्पादनाने ते शेतकरी वर्गात आदर्श ठरले.

कुस्तीच्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कुटुंबातील तरुणांना घडवण्याचे मोठे कार्य केले. त्यांचा पुतण्या गौतम मोरे हा कुस्ती क्षेत्रातील नामांकित पैलवान त्यांच्या प्रेरणेनेच घडला. त्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.

मोरे कुटुंबातील शिक्षण आणि सामाजिक योगदान:
नेताजी मोरे यांचे तीन मुलगे – राजीव मोरे, दीपक मोरे, आणि स्वाती, तिघेही उच्च शिक्षित असून, समाजकारण, शेती व आयटी क्षेत्रात आपापल्या पद्धतीने योगदान देत आहेत. दीपक मोरे यांची द्राक्ष शेती आणि उद्योजकता तर स्वाती व त्यांच्या पतीचा आयटी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यकौशल्य परिवाराच्या प्रगतीचे निदर्शक आहे.

नेताजींची सामाजिक ओळख:
नेताजींचे स्व. वसंतदादा पाटील आणि पतंगराव कदम यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे राजकीय विचार नेहमीच काँग्रेसच्या विचारसरणीशी जोडलेले राहिले. त्यांच्या निधनाने बिरणवाडी परिसराने एक आधारवड गमावला आहे.

रक्षाविसर्जन:
स्व. नेताजी मोरे यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडले. तसेच रक्षाविसर्जन उद्या शुक्रवार दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता बिरणवाडी येथे होणार आहेत.

अशा ताज्या बातम्यांसाठी आणि अद्ययावत माहितीसाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला नक्की भेट द्या आणि आमचे सोशल मीडिया हँडल्स फॉलो करा.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!