शेतकऱ्यांचा आवाज: पेठ नाका येथे सहकारी पाणी पुरवठा संस्थांचा मेळावा
कोल्हापूर, 22 डिसेंबर 2024
सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील जनाई गार्डन मल्टिपर्पज हॉल, पेठ (शिराळा रोड पेठ), गोळेवाडी बस स्टॉप, ता. वाळवा येथे बुधवार, 25 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता एक भव्य सर्वपक्षीय शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यात शासकीय पाणीपट्टी दरात झालेली दसपट वाढ आणि जलमापक यंत्र (मीटर) बसवण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची पुढील दिशा व धोरण निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे सर्व संचालक व सचिव सहभागी होणार आहेत.
मेळाव्यासाठी विविध मान्यवर नेते व शेतकरी नेत्यांची उपस्थिती निश्चित झाली आहे. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. भारत पाटणकर, आमदार अरुणअण्णा लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे, संग्राम दादा थोपटे, विजय पाटील बापू, प्रदीपराव पाटील, जे. पी. लाड, व आर. जी. तांबे यांचा समावेश आहे.
सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांनी मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किनीकर यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वसामान्यांचे आवाज बनणाऱ्या अशा महत्वाच्या बातम्या आणि अद्ययावत घडामोडींसाठी नियमितपणे वाचा ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टल आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा.

mazaawaaz
Author
महत्वाच्या बातम्या
अजितदादांना बारामतीत शासकीय निरोप. 🥀
इम्रान खान यांना 17 वर्षांची शिक्षा ⚖️
🚨 जाफराबाद गोळीबार: दोन भावांचा मृत्यू 🔫
⚡ सावळज ग्रामपंचायतीत राजीनामा सत्र 🔥
🚨दिल्लीतील वाहन चोरीत ५२% झपाट्याने वाढ! 🚗
🙏 शीला दीक्षित यांना काँग्रेसची श्रद्धांजली 🌹
Stock market