Home » बडे मुद्दे » धनंजय मुंडेवर गंभीर आरोप: पीक विमा घोटाळा आणि संतोष देशमुख हत्याकांडाच्या संदर्भात राजकीय धुरळा

धनंजय मुंडेवर गंभीर आरोप: पीक विमा घोटाळा आणि संतोष देशमुख हत्याकांडाच्या संदर्भात राजकीय धुरळा

Facebook
X
WhatsApp
Telegram

धनंजय मुंडेवर गंभीर आरोप: पीक विमा घोटाळा आणि संतोष देशमुख हत्याकांडाच्या संदर्भात राजकीय धुरळा

माझा आवाज विशेष प्रतिनिधी नागपूर 

दि. २२ डिसेंबर २०२४

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा प्रचंड धुसफूस सुरु आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सूरेश धस यांनी अधिवेशन काळात गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या राजकीय भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये विशेषतः पीक विमा घोटाळा आणि संतोष देशमुख हत्याकांड यांसारख्या गाजलेल्या मुद्द्यांचा समावेश आहे, ज्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

सूरेश धस यांचं मुख्य आरोप हे धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित पीक विमा घोटाळ्याशी आहे. या घोटाळ्याद्वारे मोठ्या प्रमाणावर वित्तीय अनियमितता झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरेश धस यांनी काही महत्त्वाच्या पुराव्यांचा संदर्भ दिला असून, त्यामध्ये कथितरित्या मुंडे यांच्या जवळ असलेल्या लोकांची संलिप्तता असण्याचा आरोप केला आहे. हे आरोप केल्यावर मुंडे यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात येऊ शकते, कारण अशा गंभीर आरोपांनी त्यांच्या आणि सरकारच्या प्रतिमेवर आणि कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण हा घोटाळा जवळ ५००० कोटी रुपयांचा असण्याची शक्यता सुरेश धस यांनी व्यक्त केली असून नेमके किती रुपये यामध्ये धनंजय मुंडे आणि संबंधित लोकांना मिळालेले आहेत हे जर जाणून घेतले तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत खूप वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

त्यानंतर, दुसरा मोठा मुद्दा म्हणजे संतोष देशमुख यांचा हत्याकांड. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचं अप्रत्यक्ष संलिग्न असण्याचा आरोप करण्यात आला आहे. या हत्याकांडामुळे राज्यात राजकीय तणाव निर्माण झाला आहे आणि खूप मोठा वाद उफाळून आला आहे. अनेक विरोधकांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या सहभागाचा आरोप केला आहे. विशेषतः, ही हत्या कोणत्या राजकीय कारणामुळे घडली, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सुरेश धस यांच्या आरोपांच्या आधारावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता भासली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या चर्चेवरील उत्तरात बोलताना म्हणले की, सरकार या सर्व आरोपांची सखोल तपासणी करणार आहे. त्यांनी सर्व घटकांची संबंधित व्यक्तींची एस आय टी आणि सीआयडीमार्फत स्वतंत्रपणे तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु या सर्व घटकांच्या पडताळणीने आणि मोक्का सारख्या कलमांच्यामुळे भविष्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आणखी एक राजकीय संकट उभं करू शकते.

तथापि, सत्ताधारी पक्षातील सुध्दा काही सदस्यांना या आरोपांबद्दल शंका आहे आणि ते देखील यावर खुलेपणाने चर्चा आणि आरोप करत आहेत. राजकीय वर्तुळात एक प्रश्न निर्माण झाला आहे की, मुंडे यांना त्यांच्या पदावरून बाजूला करणे योग्य ठरेल का? यावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील विचार वेगवेगळे आहेत, पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, धनंजय मुंडे यांच्या राजकीय भवितव्यावर गंभीर संकट आले आहे.

या प्रकरणी सरकारच्या उत्तरदायित्वाच्या दृष्टीने त्यांचे भवितव्य काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि धनंजय मुंडे यांच्यावर वाढलेल्या दबावामुळे त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली, तर राज्यातील राजकीय परिस्थितीला वेगळ्या वळणावर जाऊ शकते.

अशा आणि यासारख्या ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या माझा आवाज या न्यूज पोर्टलला आणि इतर सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!