मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून हिंदुत्ववादी संघटनांवर प्रश्नचिन्ह
– मुंबई, 22 डिसेंबर 2024
मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांचा दिवसाढवळ्या झालेला निर्घृण खून राज्यभरात खळबळ माजवणारा ठरला आहे. देशमुख हे स्थानिक पातळीवर प्रभावशाली सरपंच म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी गावासाठी १९ पुरस्कार मिळवून दिले होते. भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते बुथप्रमुख म्हणून काम करत होते आणि भाजप म्हणजे पर्यायाने हिंदुत्ववादी विचारसरणीचे ठाम समर्थक होते. मात्र, त्यांच्या हत्येनंतर हिंदुत्ववादी संघटनांची प्रतिक्रीया आणि त्यांचा सहभाग किंवा या घटनेचा विरोध करताना कुणीही दिसत नाही. अगदी बांगलादेश सारख्या प्रकरणावर देशभर हलकल्लोळ वाजवणाऱ्या या भाजपच्या सहयोगी संघटनांनी या घटनेवर मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका घेतलेली दिसून येत आहे आणि एका दुसरा कार्यकर्ता सोडला तर अभावानेच या पूर्ण प्रकरणावर कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनांनी प्रतिक्रिया देणे टाळलेल आहे ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हिंसाचाराची अमानवी घटना
संतोष देशमुख यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांनी क्रूरतेचा कळस गाठला. त्यांना पाण्यासाठी आर्जव केल्यानंतरही त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यांच्या छातीवर उड्या मारून बरगड्या मोडण्यात आल्या, आणि त्यांचा शारीरिक अपमान करण्यात आला. ही घटना मानवतेच्या नात्यानेही अत्यंत संतापजनक आहे.
हिंदुत्ववादी संघटनांची शांतता आश्चर्यकारक
देशमुख यांच्या मृत्यूनंतर एकाही हिंदुत्ववादी संघटनेने ना शोक व्यक्त केला, ना श्रद्धांजली वाहिली. “बांगलादेशातील हिंदूंवर बोलणारे लोक इथे का गप्प आहेत?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. समाजमाध्यमांवरही या मुद्द्यावर हिंदुत्ववादी नेत्यांचे मौन चर्चेचा विषय बनले आहे.
मुख्यमंत्री आणि SITच्या कारवाईवर विश्वास?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी SIT नेमली असली तरी तिच्या कामगिरीवर लोकांचा विश्वास उरला आहे का, हा प्रश्न आहे. या घटनेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी कारवाई होईल का, हे येणारा काळच ठरवेल.
माणुसकी हरवली का?
संतोष देशमुख यांच्या हत्येने समाजाच्या विवेक आणि माणुसकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जात, धर्म, आणि पक्ष यापलीकडे जाऊन मानवी हक्कांसाठी आवाज उठवणे गरजेचे आहे. समाजातील विविध घटकातून पक्ष जात पंथ धर्म याचा विचार न करता सामान्य माणूस या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत असताना दिसत असून भाजप आणि संबंधित संघटनाचे पदाधीकारी मात्र का गप्प बसलेत? याचं कोडं अजून तरी उघडताना दिसत नाही.
अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी आणि अद्ययावत घडामोडींसाठी‘माझा आवाज’ न्यूज पोर्टल आणि आमच्या इतर सोशलमीडिया हँडल्सला नक्की फॉलो करा.

mazaawaaz
Author
महत्वाच्या बातम्या
अजितदादांना बारामतीत शासकीय निरोप. 🥀
इम्रान खान यांना 17 वर्षांची शिक्षा ⚖️
🚨 जाफराबाद गोळीबार: दोन भावांचा मृत्यू 🔫
⚡ सावळज ग्रामपंचायतीत राजीनामा सत्र 🔥
🚨दिल्लीतील वाहन चोरीत ५२% झपाट्याने वाढ! 🚗
🙏 शीला दीक्षित यांना काँग्रेसची श्रद्धांजली 🌹
Stock market