Home » Uncategorized » जिओच्या नवीन ‘जिओटॅग गो’ डिव्हाइसने व्यक्तीगत वस्तू हरवण्याची समस्या संपवली!

जिओच्या नवीन ‘जिओटॅग गो’ डिव्हाइसने व्यक्तीगत वस्तू हरवण्याची समस्या संपवली!

Facebook
X
WhatsApp
Telegram

जिओच्या नवीन ‘जिओटॅग गो’ डिव्हाइसने व्यक्तीगत वस्तू हरवण्याची समस्या संपवली!

मुंबई, २१ डिसेंबर २०२४

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक अत्याधुनिक डिव्हाइस बाजारात आणले आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओने ‘जिओटॅग गो’ हे ब्लूटूथवर आधारित डिव्हाइस सादर केले आहे, जे हरवलेल्या वस्तूंचे ठिकाण अचूकपणे शोधण्यास मदत करणार आहे.

जिओटॅग गो हे भारतातील पहिले असे स्मार्ट ट्रॅकर आहे, ज्यामध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमसाठी खास सपोर्ट आहे. घरातील किल्ल्या, वॉलेट, पाळीव प्राणी किंवा इतर मौल्यवान वस्तू हरवल्यास हे डिव्हाइस त्या वस्तू शोधून काढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

जिओटॅग गो कसे कार्य करते?

हे डिव्हाइस गूगलच्या ‘फाइंड माय डिव्हाइस’ नेटवर्कशी जोडलेले असते. डिव्हाइस नियमितपणे ब्लूटूथ सिग्नल पाठवते, जे संबंधित अँड्रॉइड डिव्हाइसद्वारे ओळखले जाते. हे सिग्नल गूगलच्या ॲप मधून डिव्हाइसची अद्ययावत लोकेशन युजरला दाखवते.

वस्तू हरवल्यास ‘लॉस्ट मोड’ सक्रिय करून डिव्हाइसचे स्थान मिळाले की युजरला आपोआप सूचना मिळते.

जिओटॅग गोची किंमत आणि वैशिष्ट्ये

जिओटॅग गोची मूळ किंमत ₹2,999 असून लॉन्च ऑफर अंतर्गत ते फक्त ₹1,499 ला उपलब्ध आहे. डिव्हाइस एक वर्षाच्या वॉरंटीने सुसज्ज आहे. यामध्ये बदलण्यायोग्य CR2032 बॅटरी, 120 डेसिबलचा स्पीकर, ब्लूटूथ v5.3 कनेक्टिव्हिटी आणि अतिरिक्त बॅटरीचा समावेश आहे.

हे डिव्हाइस काळा, पांढरा, पिवळा आणि नारिंगी अशा चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. युजर्स हे डिव्हाइस रिलायन्स डिजिटल, जिओमार्ट, ॲमेझॉन आणि डिजिटल लाइफ स्टोअरमधून खरेदी करू शकतात.

जिओच्या या इनोव्हेटिव्ह डिव्हाइससह, वापरकर्ते त्यांच्या महत्त्वाच्या वस्तू हरवण्याच्या समस्यांवर पूर्णविराम लावू शकतात.

अशाच ताज्या बातम्यांसाठी आणि अद्ययावत घडामोडींसाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला भेट द्या आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!