Home » चित्रपट » बॉक्स ऑफिसवर राज करत ‘पुष्पा 2: द रुल’ चे वर्चस्व – 1400 कोटींचा जागतिक विक्रम

बॉक्स ऑफिसवर राज करत ‘पुष्पा 2: द रुल’ चे वर्चस्व – 1400 कोटींचा जागतिक विक्रम

Facebook
X
WhatsApp
Telegram

‘बॉक्स ऑफिसवर राज करत ‘पुष्पा 2: द रुल’ चे वर्चस्व – 1400 कोटींचा जागतिक विक्रम

माझा आवाज वृत्त सेवा

मुंबई: , दि. १७ डिसेंबर २०२४: पुष्पा 2: द रुल’ जगभरात बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयाने आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्या प्रभावी दिग्दर्शनामुळे चित्रपटाने नवीन विक्रमांची नोंद केली आहे.

दुसऱ्या आठवड्यातही ‘पुष्पा 2’ ची गती थांबलेली नाही. हिंदी भाषेत चित्रपटाने 561.50 कोटींची घसघशीत कमाई करत ‘सर्वाधिक कमाई करणारा डब चित्रपट’ ठरला आहे. तसेच दुसऱ्या वीकेंडमध्ये 100 कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे

भारतीय सिनेमाच्या इतिहासात नवा अध्याय

भारतीय सिनेमाच्या इतिहासात ‘पुष्पा 2’ ने 11 व्या दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या दमदार प्रवासासोबत चित्रपटाने 1322.65 कोटींच्या जागतिक कमाईचा टप्पा गाठला असून ‘दंगल’ आणि ‘बाहुबली 2’ नंतर ‘पुष्पा 2’ हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

बॉक्स ऑफिसवर स्फोटक प्रदर्शन – दिवसनिहाय कमाई (जागतिक स्तरावर):

पहिला दिवस: ₹ 282.91 कोटी

– दुसरा दिवस: ₹ 134.63 कोटी

– तिसरा दिवस: ₹ 159.27 कोटी

– चौथा दिवस: ₹ 204.52 कोटी

– पाचवा दिवस: ₹ 101.35 कोटी

– सहावा दिवस: ₹ 80.74 कोटी

– सातवा दिवस: ₹ 69.03 कोटी

– आठवा दिवस: ₹ 54.09 कोटी

– नववा दिवस: ₹ 49.31 कोटी

– दहावा दिवस: ₹ 82.56 कोटी

– अकरावा दिवस: ₹ 104.24 कोटी

एकूण कमाई: ₹ 1409 कोटी (जागतिक स्तरावर)

1400 कोटींची जागतिक कमाई

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून 11 दिवसांतच ‘पुष्पा 2’ ने 1409 कोटींच्या जागतिक कमाईचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. ‘केजीएफ 2’ चा विक्रम मोडून हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा हिट ठरला आहे.

हिंदी बॉक्स ऑफिसवर सुद्धा  स्फोटक कमाई (दुसरा आठवडा):

– शुक्रवार: ₹ 27.50 कोटी

– शनिवार: ₹ 46.50 कोटी

– रविवार: ₹ 54 कोटी

– सोमवार: ₹ 20.50 कोटी

हिंदी एकूण कमाई: ₹ 582 कोटी

पुष्पा’चा राज चालूच आहे… 

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा केवळ दक्षिणेतच नाही तर हिंदी पट्ट्यातही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. हिंदीत 600 कोटींचा टप्पा लवकरच पार करत हा चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्येही स्थान मिळवण्याच्या तयारीत आहे.

‘पुष्पा 2’ च्या यशामध्ये दिग्दर्शक सुकुमार, अभिनेत्री रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांच्याबरोबरच संगीतकार देवी श्रीप्रसाद आणि एडिटर नवीन नूली यांचे मोलाचे योगदान आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट केवळ एक सिनेमा नसून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा एक भव्य अनुभव ठरतो आहे.

पुष्पा 2′ ची ही धडाकेबाज कामगिरी पाहता तो भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक नवीन पायंडा घालणार आहे.

यासारख्या आणखी बातम्या आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “माझा आवाज” या न्यूज पोर्टल ला फॉलो करा आणि आमच्या इतर सोशल मीडिया चॅनल्स ला फॉलो करा 

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!