विजय वाकोडे (बाबा): चळवळीतील एक महत्त्वपूर्ण चेहरा हरपला
माझा आवाज प्रतिनिधी
परभणी, १६ डिसेंबर : सामाजिक आणि चळवळीतील महत्त्वाचं नाव असलेले विजय वाकोडे (बाबा) यांचे सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. दिवसभर परभणीत आयोजित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेत उपस्थित राहून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली होती. मात्र, सायंकाळी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
विजय वाकोडे (बाबा) यांचा सार्वजनिक जीवनात ठसा उमटवणारा प्रवास आज थांबला असला तरी त्यांच्या कार्याची आठवण कायम राहील. चळवळीतील एक विश्वासार्ह चेहरा, झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता, अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने समाजमनावर शोककळा पसरली आहे.
परिस्थितीने भयग्रस्त वातावरण असतानाही अशी चांगली माणसं आपल्यातून निघून जाणं अत्यंत दुःखदायक आहे. त्यांना माझा आवाज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
“आशा आहे की त्यांचं सामाजिक कार्य पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल”









