Home » राजकारण » महाराष्ट्रात महायुती सरकारचा विस्तार: मंत्रिमंडळातील नव्या चेहऱ्यांनी नागपूर येथे घेतली शपथ

महाराष्ट्रात महायुती सरकारचा विस्तार: मंत्रिमंडळातील नव्या चेहऱ्यांनी नागपूर येथे घेतली शपथ

Facebook
X
WhatsApp
Telegram

महाराष्ट्रात महायुती सरकारचा विस्तार: मंत्रिमंडळातील नव्या चेहऱ्यांनी नागपूर येथे घेतली शपथ

माझा आवाज विशेष प्रतिनिधी: नागपूर 

दिनांक १५ डिसेंबर २०२४

आज नागपूर येथे महायुती सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या शपथविधी सोहळ्यात नव्या मंत्र्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये अनुभवी नेत्यांबरोबरच तरुण नेतृत्वालाही स्थान देण्यात आले आहे, जे राज्याच्या सर्व भागांचे संतुलित प्रतिनिधित्व दर्शवते.

महायुती मंत्रिमंडळ: कॅबिनेट मंत्री”

1. चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) – नागपूर, विदर्भ

2. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) – नगर, उत्तर महाराष्ट्र

3. हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) – कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र

4. चंद्रकांत पाटील (भाजप) – पुणे, पश्चिम महाराष्ट्र

5. गिरीश महाजन (भाजप) – जळगाव, उत्तर महाराष्ट्र

6. गुलाबराव पाटील (शिवसेना) – जळगाव, उत्तर महाराष्ट्र

7. गणेश नाईक (भाजप) – नवी मुंबई, मुंबई

8. दादाजी भुसे (शिवसेना) – नाशिक, उत्तर महाराष्ट्र

9. संजय राठोड (शिवसेना) – वाशीम, विदर्भ

10. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) – बीड, मराठवाडा

11. मंगलप्रभात लोढा (भाजप) – मुंबई, मुंबई

12. उदय सामंत (शिवसेना) – रत्नागिरी, कोकण

13. जयकुमार रावल (भाजप) – धुळे, उत्तर महाराष्ट्र

14. पंकजा मुंडे (भाजप) – बीड, मराठवाडा

15. अतुल सावे (भाजप) – छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा

16. अशोक उईके (भाजप) – यवतमाळ, विदर्भ

17. शंभुराज देसाई (शिवसेना) – सातारा, पश्चिम महाराष्ट्र

18. आशिष शेलार (भाजप) – मुंबई, मुंबई

19. दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी) – पुणे, पश्चिम महाराष्ट्र

20. आदिती तटकरे (राष्ट्रवादी) – रायगड, कोकण

21. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) – सातारा, पश्चिम महाराष्ट्र

22. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी) – नाशिक, उत्तर महाराष्ट्र

23. जयकुमार गोरे (भाजप) – सातारा, पश्चिम महाराष्ट्र

24. नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी) – नाशिक, उत्तर महाराष्ट्र

25. संजय सावकारे (भाजप) – जळगाव, उत्तर महाराष्ट्र

26. संजय शिरसाठ (शिवसेना) – छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा

27. प्रताप सरनाईक (शिवसेना) – ठाणे, मुंबई

28. भरत गोगावले (शिवसेना) – रायगड, कोकण

29. मकरंद जाधव-पाटील (राष्ट्रवादी) – सातारा, पश्चिम महाराष्ट्र

30. नितेश राणे (भाजप) – सिंधुदुर्ग, कोकण

31. आकाश फुंडकर (भाजप) – बुलढाणा, विदर्भ

32. बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी) – लातूर, मराठवाडा

33. प्रकाश आबीटकर (शिवसेना) – कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र

राज्यमंत्री

34. माधुरी मिसाळ (भाजप) – पुणे, पश्चिम महाराष्ट्र

35. आशिष जयस्वाल (शिवसेना) – नागपूर, विदर्भ

36. पंकज भोयर (भाजप) – वर्धा, विदर्भ

37. मेघना बोर्डीकर (भाजप) – परभणी, मराठवाडा

38. इंद्रनिल नाईक (राष्ट्रवादी) – यवतमाळ, विदर्भ

39. योगेश कदम (शिवसेना) – रत्नागिरी, कोकण

नागपूर येथे रंगला शपथविधी सोहळा

या शपथविधी सोहळ्याचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले होते. या सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. शपथविधीच्या माध्यमातून महायुती सरकारने महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक आणि राजकीय प्रतिनिधित्वाला स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे.

भविष्यातील आव्हाने आणि संधी:

या मंत्रिमंडळाकडून राज्यातील शाश्वत विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार, आणि शेतकरी तसेच युवक कल्याणावर भर देण्याच्या अपेक्षा आहेत. राज्यातील जनतेसाठी पारदर्शक आणि समन्वयशील प्रशासन देणे हे या मंत्रिमंडळासमोरील मुख्य उद्दिष्ट राहील.

“माझा आवाज” महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे सविस्तर विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. नवीन मंत्रिमंडळास शुभेच्छा!

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!