Home » स्पोर्ट्स » केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आमदार रोहित दादा पाटील यांच्या हस्ते

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आमदार रोहित दादा पाटील यांच्या हस्ते

Facebook
X
WhatsApp
Telegram

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आमदार रोहित दादा पाटील यांच्या हस्ते

सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथे आज शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती तासगाव अंतर्गत केंद्र सावळज आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आदरणीय आमदार रोहीत दादा आर.आर. पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

उद्घाटनप्रसंगी आमदार रोहित दादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रीडा ही शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडामध्ये सातत्य ठेवून मेहनत करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी केंद्रप्रमुख श्रीम. गुणवंता खोत, संयोजक श्री आण्णासो गायकवाड, श्री विजय चव्हाण, श्री विकास पाटील, श्री एन.डी. पाटील आणि श्री सुधीर माळवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये मुख्याध्यापक श्री विजय चव्हाण, श्री दगडू जाधव, सौ. उज्वला पाटील मॅडम, जि.प. सदस्य सागर दादा पाटील, ताजुद्दीन भैया तांबोळी, प्रकाश बापू चव्हाण, शिंदे सर, पैलवान राजू चव्हाण आणि सरपंच चव्हाण मॅडम यांचा समावेश होता.

या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव देऊन त्यांच्यातील क्रीडा गुणांना चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि आयोजकांनी घेतलेल्या परिश्रमांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!