Home » अर्थकारण » तासगावमध्ये प्रथमच स्वर्गीय आर. आर. आबा पाटील आंबा महोत्सवाचे भव्य आयोजन

तासगावमध्ये प्रथमच स्वर्गीय आर. आर. आबा पाटील आंबा महोत्सवाचे भव्य आयोजन

Facebook
X
WhatsApp
Telegram

तासगावमध्ये प्रथमच स्वर्गीय आर. आर. आबा पाटील आंबा महोत्सवाचे भव्य आयोजन

तासगाव, 27 एप्रिल 2025:

माझा आवाज विशेष प्रतिनिधी 

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तासगाव नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने अक्षय तृतीयेनिमित्त तासगाव नगरीमध्ये प्रथमच स्वर्गीय आर. आर. आबा पाटील आंबा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात थेट आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून ग्राहकांना केसर, देवगड व रत्नागिरीचा सुप्रसिद्ध हापूस तसेच पायरी प्रकारातील दर्जेदार आंब्यांची खरेदी करण्याची अनमोल संधी मिळणार आहे.

आज सकाळी एका भव्य समारंभात या आंबा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये स्थानिक मान्यवर, व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. महोत्सवाचा उद्देश स्थानिक शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडणे आणि उच्च प्रतीचे फळ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

हा महोत्सव १ मे २०२५ पर्यंत तासगाव शहर व परिसरातील सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. शहरातील नागरिकांसाठी हा एक सुवर्णसंधी आहे, ज्यात त्यांना थेट शेतकऱ्यांकडून ताजे आणि दर्जेदार आंबे खरेदी करता येणार आहेत. यामुळे ग्राहकांना वाजवी दरात उच्च दर्जाचे आंबे मिळणार असून शेतकऱ्यांनाही थेट विक्रीद्वारे योग्य मोबदला मिळणार आहे.

तासगाव नगरीतील सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


अशाच दर्जेदार बातम्या आणि अपडेट्ससाठी ‘Maza Awaaz’ न्यूज पोर्टल आणि आमचे यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर व अन्य सोशल मीडिया हँडल्स फॉलो करा.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!