Home » Uncategorized » दिल्लीतील बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात अमित शहांचे खळबळजनक आरोप: “आप” सरकारवर घसरले ताशेरे

दिल्लीतील बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात अमित शहांचे खळबळजनक आरोप: “आप” सरकारवर घसरले ताशेरे

Facebook
X
WhatsApp
Telegram

दिल्लीतील बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात अमित शहांचे खळबळजनक आरोप: “आप” सरकारवर घसरले ताशेरे

माझा आवाज विशेष प्रतिनिधी 

दिनांक: 27 जानेवारी 2025 

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी नरेला विधानसभा मतदारसंघात आयोजित सभेमध्ये दिल्लीत सत्तारूढ आम आदमी पार्टी (आप) सरकारवर जोरदार हल्ला चढविला. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारला “आवैध आमदानीवाली पार्टी” असे संबोधले आणि त्यांच्या दहा वर्षांच्या कारभारात भ्रष्टाचार व फसवेगिरीचे आरोप केले.

विशेष म्हणजे, अमित शहा मागील 11 वर्षांपासून भारताचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालयाने देशातील पोलीस प्रशासन व अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची जबाबदारी ही अमित शहा यांची आहे. दिल्लीतील बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित आणि रोहिंग्यांना आश्रय देण्यात आप सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप शहा यांनी केला आहे. मात्र ते स्वतः मागील अकरा वर्षांपासून भारत सरकारचे गृहमंत्री आहेत हे सोयीस्कर दृष्ट्या विसरलेले दिसत आहे आणि त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

शहा म्हणाले, “आप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दिल्लीचा विकास ठप्प झाला आहे. भ्रष्टाचाराला थारा देऊन दिल्लीत बेकायदेशीर स्थलांतरितांची वस्ती वाढली आहे. भाजपला स्पष्ट बहुमत दिल्यास आम्ही दिल्लीला बांगलादेशी स्थलांतरित आणि रोहिंग्यांपासून मुक्त करू व जगातील क्रमांक एकची राजधानी बनवू.”

अमित शहांचे हे वक्तव्य दिल्लीच्या राजकीय वातावरणाला तापवणारे ठरले आहे. त्यांनी केजरीवाल सरकारवर फसवे दावे आणि जनतेची दिशाभूल केल्याचेही आरोप केले आहेत.

अधिक अपडेट्ससाठी आणि बातम्यांसाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टल आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्सना फॉलो करा.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!