Home » बातम्या » आमदार रोहित आर आर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; अथर्व सांगळेच्या दुर्मिळ आजारावरील मोफत उपचाराला मंजुरी

आमदार रोहित आर आर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; अथर्व सांगळेच्या दुर्मिळ आजारावरील मोफत उपचाराला मंजुरी

Facebook
X
WhatsApp
Telegram

आमदार रोहित आर आर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; अथर्व सांगळेच्या दुर्मिळ आजारावरील मोफत उपचाराला मंजुरी

माझा आवाज विशेष प्रतिनिधी
मुंबई, २ जानेवारी २०२५

तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयातील महिला कर्मचारी कविता सांगळे यांच्या मुलाला मिळालेले मोफत उपचाराचे आश्वासन आज प्रत्यक्षात उतरले आहे. कविता सांगळे यांच्या मुलाला Gaucher या दुर्मिळ आजाराचा त्रास असून, या आजारावरील उपचार महाग असल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.

या संदर्भात, रोहित पाटील यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतून या उपचाराचा खर्च उचलण्याची विनंती केली होती. या पत्राची दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ यामध्ये लक्ष घालून मंत्रालयाकडून अथर्वच्या मोफत उपचाराला मंजुरी देण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाची पार्श्वभूमी:

कविता सांगळे या ठाणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असून त्यांचा मुलगा अथर्व सांगळे Gaucher या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. या आजारावर औषधोपचार सुरु असून, त्यासाठी होणारा खर्च प्रचंड आहे. मदतीसाठी कविता सांगळे यांनी कल्याण-डोंबिवलीतील युवा समाजसेवक अमित कोळेकर यांची मदत घेतली. अमित कोळेकर यांनी ही बाब आमदार रोहित पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली.

रोहित पाटील यांनी या गंभीर परिस्थितीला गांभीर्याने घेत, राज्य सरकारकडे प्रस्ताव मांडला आणि योजनेतून हा खर्च मंजूर होण्यासाठी पाठपुरावा केला. आज मंत्रालयातून या फाईलवर मंजुरी मिळाली असून, पुढील प्रक्रियेसाठी ती वर्ग करण्यात आली आहे.

कविता सांगळे यांची प्रतिक्रिया:

“अथर्वच्या उपचारांसाठी आलेल्या या निर्णयामुळे आमच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. या यशामागे रोहित दादांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकी आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो,” अशी प्रतिक्रिया कविता सांगळे यांनी दिली.

‘माझा आवाज’चे आवाहन:

समाजहिताच्या आणि सामाजिक जबाबदारीच्या प्रेरणादायी बातम्यांसाठी ‘माझा आवाज’ या मराठी न्यूज पोर्टलला नियमितपणे भेट द्या. आमचं सोशल मीडिया हँडल्स देखील फॉलो करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स मिळवा.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!