Home » बातम्या » टेंभू उपसा सिंचन योजना: टप्पा क्र. ५ पाईपलाईन कॅनॉलला जोडली जाणार!!! आमदार रोहित दादा पाटील यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

टेंभू उपसा सिंचन योजना: टप्पा क्र. ५ पाईपलाईन कॅनॉलला जोडली जाणार!!! आमदार रोहित दादा पाटील यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय 

Facebook
X
WhatsApp
Telegram

टेंभू उपसा सिंचन योजना: टप्पा क्र. ५ पाईपलाईन कॅनॉलला जोडली जाणार!!! आमदार रोहित दादा पाटील यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय 

माझा आवाज तासगांव प्रतिनिधी

०१ जानेवारी २०२५, तासगांव 

टेंभू उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक पाच अंतर्गत पळशी गावातील तलावामधून सिद्धेवाडी आणि सावळज गावांसाठी पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी माननीय आमदार रोहित आर.आर. पाटील आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अभियंता हरगुडे साहेब यांची महत्त्वाची भूमिका ठरली आहे.

तलावाच्या क्षमतेत वाढ आणि नव्या पाईपलाईनचा उपयुक्त उपयोग

सिद्धेवाडीतील तलावाची पूर्वीची पाण्याची क्षमता 78 MCFT इतकी मर्यादित होती. मात्र, शेतकऱ्यांनी केलेल्या श्रमांमुळे तलावातील गाळ काढून त्याची क्षमता 90 ते 100 MCFT पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी अपेक्षा आहे.

साडेतीन फुटी पाईपलाईनद्वारे पळशी तलावातील पाणी सिद्धेवाडी तलावात पोहोचवले जाणार आहे. या पाण्याचा उपयोग प्रथम तलावाची झिरो लेवल गाठण्यासाठी केला जाईल. त्यानंतरच सावळज व सिद्धेवाडी या गावांपर्यंत पाणी पुरवले जाईल. मात्र, सावळजसाठी आलेले पाणी थेट सिद्धेवाडी कॅनॉलमध्ये सोडण्याचा निर्णय घेतल्यास दोन्ही गावांना फायदा होईल, अशी शेतकऱ्यांची मागणी होती.

रोहित दादा पाटील यांचा ठोस पुढाकार

माननीय आमदार रोहित दादा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि पळशी ते सिद्धेवाडी तलाव पाईपलाईनमधून दुसरा फाटा सिद्धेवाडी कॅनॉलमध्ये सोडण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या ठोस निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रमुख उपस्थिती:

या सर्वेक्षणाच्या आणि चर्चेच्या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये तासगावचे राष्ट्रवादी अध्यक्ष विश्वास तात्या पाटील युवा नेते ताजुद्दीन तांबोळी, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्तात्रय हावळे, सावळज माजी जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील, राजू सावंत, डॉक्टर ओमन पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय दादा पाटील (वडगांव), डोंगरसोनी विकास सोसायटीचे चेअरमन पंकज पाटील, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती सतीश झांबरे, डोंगरसोनी ग्रामपंचायत चे उप सरपंच किशोर कोडग, वायफळेचे सरपंच संतोष पाटील, राजेश पाटील, आर.जे. पाटील सर, घाटनांद्रेचे सरपंच अमर शिंदे, तिसंगीचे माजी सरपंच वामन कदम, वाघोलीचे दीपक शिंदे, कुंडलापूरचे दीपक चव्हाण, जरंडीचे सरपंच रवींद्र शिंत्रे व रामराव शिंदे तसेच जरंडी ग्राम पंचायत सदस्य सतीश शिंदे यांचा समावेश होता.

शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या

या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होतील, असा विश्वास सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केला. माननीय आमदार रोहित दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘माझा आवाज’सोबत जोडत रहा, नेहमी अपडेटेड रहा!
सिंचन योजना, शेतकऱ्यांच्या समस्या, आणि त्यावरच्या निर्णयांसारख्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टल आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा!

आवाज माझा ….विश्वास तुमचा….”

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!