मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेसाठी आढावा बैठक – प्रकल्प विकासकांसाठी अडथळे दूर करण्यावर भर
माझा आवाज प्रतिनिधी मुंबई
मुंबई, ३१ डिसेंबर २०२४
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अप्पर मुख्य सचिव, सचिव, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीत सौर कृषी वाहिनी या महाराष्ट्र शासनाच्या फ्लॅगशीप योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. प्रकल्प विकासकांना ग्रामपंचायतीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची आवश्यकता रद्द करण्याचा आणि सर्व परवानग्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश दिले की, प्रकल्पांशी संबंधित अडथळे सोडवण्यासाठी नियमित बैठका घ्याव्यात व पंधरा दिवसांत अहवाल सादर करावा. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी जबाबदारीने आणि गतीने काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
सौर कृषी वाहिनी २.० या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना स्वस्त आणि शाश्वत ऊर्जेचा लाभ मिळण्यासह ग्रामीण भागात विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.‘
माझा आवाज’ न्यूज पोर्टलसोबत रहा अपडेटेड!अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आणि अद्ययावत घडामोडींसाठी आमच्या ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला नियमित भेट द्या. तसेच, आमच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करून थेट आणि विश्वसनीय माहितीचा लाभ घ्या!









