केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड: राजकीय वर्तुळात खळबळ, मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गंभीर आरोप
माझा आवाज विशेष प्रतिनिधी
मुंबई, 30 डिसेंबर 2024
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात नवनवे वळणे समोर येत आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक तथ्ये उघड होत असून राजकीय वर्तुळात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार उत्तम जानकर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जानकर यांनी दावा केला की, वाल्मिक कराड हे रोज 1 कोटी रुपये घरी नेत असल्याचे पुरावे तपास यंत्रणांकडे आहेत. त्यांनी कराड यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करताना, या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचाही अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप केला आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे. तपास यंत्रणा या संदर्भात काय पावले उचलणार आणि पुढे काय तथ्ये समोर येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अशाच अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या व अपडेट्ससाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला फॉलो करा. आमच्या सोशल मीडिया हँडल्सवरही जॉइन व्हा आणि प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा.









