Home » स्पोर्ट्स » दुहेरी आनंद! कोनेरु हम्पीने दुसऱ्यांदा जिंकला फिडे महिला वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपचा किताब!

दुहेरी आनंद! कोनेरु हम्पीने दुसऱ्यांदा जिंकला फिडे महिला वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपचा किताब!

Facebook
X
WhatsApp
Telegram

दुहेरी आनंद!
कोनेरु हम्पीने दुसऱ्यांदा जिंकला फिडे महिला वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपचा किताब!

माझा आवाज विशेष प्रतिनिधी 

मुंबई, 29 डिसेंबर 2024: भारतीय बुद्धिबळ प्रेमींसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. कोनेरु हम्पीने 2024 च्या फिडे महिला वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवत देशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिमानाने फडकवला आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत हम्पीने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दुसऱ्यांदा हा बहुमान पटकावला. यापूर्वी 2019 साली मॉस्को येथे तीने ही चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला होता.

भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी ही एक अभूतपूर्व कामगिरी आहे. हम्पीचा संयम, अचूक रणनीती, आणि तिच्या खेळातील सुस्पष्टता यामुळे तीने पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले आहे. न्यूयॉर्कच्या अंतिम सामन्यात तिने अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा पराभव करून चॅम्पियनशिपचा मुकुट जिंकला.

कोनेरु हम्पीला मनःपूर्वक अभिनंदन! तू संपूर्ण देशाला अभिमान वाटण्यासारखा क्षण दिलास.

अशाच महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट्ससाठी माझा आवाज या आपल्या आवडत्या मराठी न्यूज पोर्टलला फॉलो करा. आमच्या इतर सोशल मीडिया हँडल्सवर देखील आमच्याशी जोडलं राहा!

माझा आवाज – तुमचं स्वतःचं बातमीदार पोर्टल!

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!