Home » Uncategorized » गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद का नाकारलं? कार्यकर्ते नाराज….

गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद का नाकारलं? कार्यकर्ते नाराज….

Facebook
X
WhatsApp
Telegram

गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद का नाकारलं? कार्यकर्ते नाराज….

मुंबई, 26 डिसेंबर 2024

माझा आवाज विशेष प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील जनतेसाठी आशेचा किरण ठरलेले गोपीचंद पडळकर यांचे नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी होते. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांचे नाव यादीतून वगळले गेले, यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. सांगली जिल्ह्यातील भाजप समर्थकांसाठी आणि पडळकर यांचे अनुयायांसाठी हा मोठा धक्का ठरला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी नुकत्याच झालेल्या सत्कार समारंभात मंत्रिपद न मिळाल्याबाबत भाष्य करताना स्पष्ट केले की, “मी सध्या बाळूमामाच्या भूमिकेत आहे, पण भविष्यात ‘बापू बिरू’ व्हायची वेळ येईल, तेव्हा काय करायचं ते ठरवू.” त्यांच्या या विधानातून आगामी काळातील राजकीय रणनीतीचे संकेत मिळतात.

राज्यातील जातीय समीकरणांमुळे आणि राजकीय दबावांमुळे पडळकर यांना मंत्रीपद मिळाले नाही, असा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. धनगर समाजाला दिलासा देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी राष्ट्रवादीने दत्तामामा भरणे यांना मंत्रीपद दिले, तर भाजपने राम शिंदे यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देऊन त्यांचे पुनर्वसन केले. मात्र, गोपीचंद पडळकर यांच्या पाठीराखे आणि कार्यकर्त्यांच्या मधील असंतोष भाजपसाठी आव्हान ठरतो आहे.

पडळकर यांनी आपल्या वक्तव्यांमध्ये आक्रमकतेचा सूर असाच ठेऊन वादग्रस्त वक्तव्य आणि वादग्रस्त मुद्द्यांना हात न घालता करत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज असल्याचे काही ज्येष्ठ पत्रकारांनी निरीक्षण नोंदवले असून जर हे बदल गोपीचंद पडळकर यांनी आत्मसात केले तर हा नेता राज्यातील पुढचा गोपीनाथ मुंडे सारखा प्रभावी नेता ठरू शकतो असेही संबंधित ज्येष्ठ पत्रकार यांच्या बोलण्यातून जाणवते.

गोपीचंद पडळकर यांनी मात्र मंत्रिपद न मिळाल्याबद्दल दुःख करत न बसता कार्यकर्त्यांना जोश देण्यासाठी “माझा नेता मुख्यमंत्री झाला आहे, त्यामुळे मला मंत्रिपदाची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हक्काने कामे करून घेऊ,” मी फक्त माझ्याकडे काम घेऊन या असे त्यांनी नमूद केले आहे.

सांगली जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा जनतेची होती. मात्र, गोपीचंद पडळकर आणि सुरेश खाडे यांना संधी न मिळाल्यामुळे जिल्ह्याला हा मोठा धक्का बसला आहे. भविष्यात पडळकर यांच्या सारख्या आक्रमक नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

अशाच ताज्या आणि विश्लेषणात्मक बातम्यांसाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!