Home » राजकारण » महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात विलंब: राजकीय स्थिरतेवर आणि निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह?

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात विलंब: राजकीय स्थिरतेवर आणि निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह?

Facebook
X
WhatsApp
Telegram

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात विलंब: राजकीय स्थिरतेवर आणि निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह?

मुंबई, 22 डिसेंबर 2024: महाराष्ट्र राज्यात 20 नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत भाजपा, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऐतिहासिक बहुमत मिळाले. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला, परंतु मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधी उशीराने म्हणजे तब्बल १२ दिवसानंतर ५ डिसेंबरला झाला झाला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल १० दिवसांनी १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आणि ३९ मंत्र्यांचा जंबो मंत्रिमंडळाचा शपथवीधी संपन्न झाला. मात्र मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे.

राज्याच्या प्रशासनाला जवळपास एक महिना पूर्णत्वाकडे जात असताना, खातेवाटपाच्या विलंबामुळे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्रासारख्या प्रचंड अर्थव्यवस्था असलेल्या राज्यासाठी हे अत्यंत अडचणीचे आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाची वार्षिक उलाढाल सुमारे सात लाख कोटी रुपये आहे, आणि महिन्याच्या उलाढालीचा विचार करता सुमारे सव्वा लाख कोटींचा व्यवहार होत असतो. अशा परिस्थितीत राज्य सरकारला आणि कोणत्याही खात्याला मंत्री नसणे ही शोकांतिका आहे.

मंत्रिमंडळ विस्तारातील राजकीय समीकरणे
राजकीय विश्लेषकांच्या मते, खातेवाटपाचा विलंब हा सत्ताधारी पक्षांतील अंतर्गत संघर्ष आणि राजकीय दबावाचा परिणाम आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुरेसा वाटा मिळेल का? एकनाथ शिंदे गटाची शिवसेना की अजितदादा यांची राष्ट्रवादी यांचा या सत्तासंघर्षात बळी जाणार का? भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कोणती नवी रणनीती आखली आहे? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.

भाजपने आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांच्या निवडीतून आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने नवीन समीकरणे जुळवण्याचे काम सुरू आहे. भाजपच्या “शत-प्रतिशत भाजप” या मानसिकतेमुळे इतर घटक पक्षांमध्ये अस्वस्थता आहे.

जनतेत नाराजीचा सूर
राज्यातील जनतेत मात्र या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सत्ताधारी गटाकडे बहुमत असूनही सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत होत असलेला विलंब हा त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करतो. सरकारला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यश येईल का, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या भवितव्यावर परिणाम?
खातेवाटपाच्या मुद्द्यामुळे सरकार स्थिर राहील का, यावर अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. आगामी काळात महायुती सरकारमध्ये राजकीय स्थैर्य प्रस्थापित होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

असेच महत्त्वाचे आणि ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवण्यासाठी ‘माझा आवाज’च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो करा.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!