कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पलायन, सुरक्षा यंत्रणांना शॉक
कोल्हापूर, २१ डिसेंबर २०२४
कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात एक जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी सुरक्षेच्या रेषा ओलांडून फरार झाला आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाची सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे.
सुरक्षा यंत्रणेची मोठी चुक आणि कैद्याची शिताफीने केलेली पलायनाची घटना कोल्हापूरच्या कालंबा कारागृहात घडली. कैदी ज्याचे नाव वजीर नानसिंग बारेला वय ५० हा कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, त्याने खूप विचारपूर्वक कारागृहाच्या सुरक्षिततेच्या आणि यंत्रणेला चकवा देत कारागृहाबाहेर जाण्याचा मार्ग शोधला. ज्या कैद्यांची कारागृहात वर्तणूक चांगले असते अशा कैद्यांना खुल्या कारागृहामध्ये टाकलं जातं आणि कारागृहाच्या शेजारी असलेल्या शेतामध्ये कामासाठी नेलं जातं मात्र या दहा ते बारा कैद्यांच्यासाठी एकच सुरक्षा रक्षक असतो आणि या सुरक्षा रक्षकाला चकवा देऊन हा कैदी पळाल्याची माहिती मिळत आहे.
फरारीची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी आणि कारागृह प्रशासनाने तात्काळ शोध मोहीम सुरू केली असून, विविध ठिकाणी पळालेला कैदी शोधण्यासाठी टीम काम करत आहे. मात्र, ही घटना कारागृह प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यासाठी कैदी सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न आहे.
या घटनेनंतर तात्काळ उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना रोखता येतील आणि सुरक्षा यंत्रणा सुधारली जाईल.
माझा आवाजने या घटनेवर माहिती दिली असून, अशी अधिक अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया आमच्या न्यूज पोर्टलला आणि सोशल मीडियावर फॉलो करा.









