महायुतीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आजच होणार? विधान परिषदेत शिवसेनेच्या नेत्याचं सूचक वक्तव्य
माझा आवाज विशेष प्रतिनिधी
मुंबई, १९ डिसेंबर २०२४
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आजच होण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी विधान परिषदेतील चर्चेदरम्यान सूचित केले. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खातेवाटपावर विचारलेला प्रश्न व त्यावर झालेली चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार शशिकांत शिंदे यांनी खातेवाटपाबाबत विधान परिषदेच्या उपसभापतींना विचारणा केली. “पुरवणी मागण्या विविध खात्यांच्या आहेत. खातेवाटप नसल्याने उत्तर देण्याची जबाबदारी कोणावर आहे?” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.
त्यावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, “खातेवाटप आजच होण्याची शक्यता आहे. उद्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरूवात होईल, त्यामुळे त्याआधी खातेवाटप होईल आणि संबंधित खात्यांचे मंत्री उत्तर देतील.”
महायुतीचा ऐतिहासिक विजय आणि मंत्रिमंडळाची प्रतीक्षा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. भाजप, शिवसेना (शिंदे गट), आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी मिळून तब्बल २३५ जागा जिंकल्या. मात्र, सरकार स्थापनेला आणि मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या शपथविधीला तब्बल१२ दिवस लागले, आणि मंत्रिमंडळ विस्ताराला आणखी वेळ लागला आणि मोठ्या प्रतीक्षा नंतर पाठीमागील रविवारी म्हणजे १५ डिसेंबर रोजी ३९ मंत्र्यांचा शपथविधी नागपूर येथे विधानभवनाच्या प्रांगणात संपन्न झाला.
राज्याच्या जनतेला महायुतीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप कधी होईल, याची उत्सुकता होती. सरकारने ३९ मंत्र्यांचा समावेश करत विस्तार केला, पण अद्यापही खातेवाटप न झाल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
सामान्य जनतेचा रोष
खातेवाटपाच्या विलंबामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर गंभीर परिणाम होत असल्याची टीका होत आहे. महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात सत्तास्थापनेनंतरही खातेवाटपाचा निर्णय प्रलंबित असणे ही राज्याच्या प्रगतीसाठी बाधक असल्याचे जनतेचे मत आहे. जनतेने भरभरून पाठिंबा देऊन आज पर्यंत कुणालाही मिळाल नाही इतकं प्रचंड बहुमत घेऊन युतीला निवडून आणला असल तरी सरकार स्थापनेतील आणि मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपतील विलंब पाहता जनतेच्या मनात प्रश्न उभा राहतो आहे की आम्ही खरंच बरोबर लोकांना निवडून दिलं की नाही?
महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या ताज्या अपडेट्ससाठी माझा आवाज न्यूज पोर्टल आणि आमच्या इतर सोशल मीडिया हँडल्सना फॉलो करा.
महायुतीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आजच होणार? विधान परिषदेत शिवसेनेच्या नेत्याचं सूचक वक्तव्य!!! सामान्य जनतेत मात्र एक महिना चाललेल्या या घोळाबद्दल प्रचंड नाराजी

mazaawaaz
Author
महत्वाच्या बातम्या
अजितदादांना बारामतीत शासकीय निरोप. 🥀
इम्रान खान यांना 17 वर्षांची शिक्षा ⚖️
🚨 जाफराबाद गोळीबार: दोन भावांचा मृत्यू 🔫
⚡ सावळज ग्रामपंचायतीत राजीनामा सत्र 🔥
🚨दिल्लीतील वाहन चोरीत ५२% झपाट्याने वाढ! 🚗
🙏 शीला दीक्षित यांना काँग्रेसची श्रद्धांजली 🌹
Stock market