रुपयाच्या घसरणीवर मल्लिकार्जुन खरगे यांची मोदींवर उपहासात्मक टीका.
माझा आवाज विशेष प्रतिनिधी
दिल्ली, 19 डिसेंबर 2024
रुपया आजपर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचत 85 च्या पुढे गेला आहे. यामुळे देशातील आर्थिक चिंतेचे वातावरण अधिक गंभीर झाले आहे. यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहासात्मक शैलीत टीका करत त्यांच्या जुन्या भाषणांची आठवण करून दिली आहे.
खरगे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, “मार्गदर्शक मंडल”, “ICU”, “रुपया गिरा नहीं, डॉलर बढ़ा” अशा वाक्यांची आठवण करून देत पंतप्रधानांच्या भाषणांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. खरगे यांनी म्हटले की, “आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा उडवूनही मोदी सरकार पूर्णपणे बेफिकीर आणि उदासीन असल्याचे दिसते. देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे कुत्सित राजकारण सातत्याने सुरू आहे.”
रुपयाची किंमत घसरत असतानाच व्यापार तुटीनेही उच्चांक गाठला आहे. खरगे यांनी टोला लगावत म्हटले की, “श्रीमान नरेंद्र मोदी भारताला ‘विश्वगुरु’ बनवण्याचा दावा करत होते. मात्र, रुपया मजबूत ठेवूनच हे शक्य होऊ शकते, हे ते विसरले आहेत.”
देशातील आर्थिक व्यवस्थेबाबत काँग्रेसचे हे मत मोदी सरकारसाठी गंभीर प्रश्न उभे करत आहे. आर्थिक क्षेत्रात तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सुचवले आहे.
अशाच ताज्या अपडेट्स आणि बातम्यांसाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टल आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा.
रुपयाच्या घसरणीवर मल्लिकार्जुन खरगे यांची मोदींवर उपहासात्मक टीका

mazaawaaz
Author
महत्वाच्या बातम्या
अजितदादांना बारामतीत शासकीय निरोप. 🥀
इम्रान खान यांना 17 वर्षांची शिक्षा ⚖️
🚨 जाफराबाद गोळीबार: दोन भावांचा मृत्यू 🔫
⚡ सावळज ग्रामपंचायतीत राजीनामा सत्र 🔥
🚨दिल्लीतील वाहन चोरीत ५२% झपाट्याने वाढ! 🚗
🙏 शीला दीक्षित यांना काँग्रेसची श्रद्धांजली 🌹
Stock market