अस्मितेच्या लढ्यासाठी एकजूट होण्याचे छगन भुजबळ यांचे आवाहन – येवला कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक
माझा आवाज: विशेष प्रतिनिधी
येवला: येवला संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्रीपदावर डावलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भावनांना वाचा फोडत, “हा लढा मंत्रीपदाचा नाही, तर अस्मितेचा आहे,” असे ठामपणे सांगितले.
“मी शून्यातून निर्माण झालेल्या संघर्षाची साक्ष देणारा आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ मी विविध मंत्रीपदांवर काम केले आहे. त्यामुळे मंत्रीपदाचा हा प्रश्न नाही. आपण सर्वांनी एकसंध राहून मतदारसंघातील जनतेचा विश्वास जिंकण्यावर भर दिला पाहिजे,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भुजबळ यांनी येवला-लासलगाव मतदारसंघातील जनतेचे विशेष आभार मानले. “आपल्या मतदारसंघातील जनतेने मला पाचव्यांदा प्रतिनिधित्वाची संधी दिली आहे. मी मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्द दिला आहे आणि तो पूर्ण करणे ही माझी प्राथमिकता आहे. विकासाची कामे अविरत सुरू राहतील, याची खात्री मी देतो,” असे त्यांनी सांगितले.
बैठकीत कार्यकर्त्यांनी मंत्रिमंडळातून डावलल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि छगन भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सदैव सोबत असल्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, विश्वासबापू आहेर, डी.के. जगताप, अरुणमामा थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, किसनकाका धनगे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, एल.जी. कदम, अर्जुन कोकाटे, डॉ. श्रीकांत आवारे, दिपक लोणारी, राजश्री पहिलवान, सुरेखा नागरे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, दत्ता निकम, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, गणपत कांदळकर, विनायक भोरकडे, साहेबराव आहेर, विनोद जोशी, दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, दत्ताकाका रायते, विलास गोरे, शिवाजी सुपणर, अशोक नागरे, संजय पगारे, सचिन कळमकर, कैलास सोनवणे, बालेश जाधव, डॉ. प्रवीण बुल्हे, तानाजी आंधळे, मलिक मेंबर, मतीन अन्सारी, पांडुरंग राऊत, सर्जेराव सावंत, डॉ. वैशाली पवार, अनिल सोनवणे, बबन शिंदे, अशोक संकलेचा, अल्केश कासलीवाल, सोहील मोमीन, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, भूषण लाघवे, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, गोटू मांजरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
छगन भुजबळ यांची अस्मितेच्या लढ्यासाठी दिलेली हाक आणि विकास कामांची ग्वाही कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरली आहे.
या आणि अशा अनेक बातम्या आणि ताज्या घडामोडी साठी “माझा आवाज” या न्यूज पोर्टलला फॉलो करा तसेच आमच्या इतर सोशल मीडिया हँडल्स ना फॉलो करा









