ब्राम्हणी नेणीव बाहेर आली…आंबेडकर आंबेडकर करतात यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्गात गेले असते..अमित शहा यांच वादग्रस्त वक्तव्य
माझा आवाज प्रतिनिधी दिल्ली
“आंबेडकर, आंबेडकर करतात यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्गात गेले असते” असे विधान गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेत केल्याने वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यामुळे ब्राह्मणी मानसिकतेची नेणीव पुन्हा एकदा जाणिवेत आली आहे.
ब्राह्मणी प्रवृत्ती बहुजनांच्या महामानवांचा केवळ वरवरचा सन्मान करण्याचा आव आणते; प्रत्यक्षात मात्र त्यांच्याबद्दल द्वेष आणि निंदा करणे, टिंगल उडवणे हेच त्यांचे मूळ स्वरूप राहिले आहे. जागतिक कीर्तीच्या विचारवंत, अर्थतज्ज्ञ, आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असे द्वेषमूलक विधान करताना अमित शहा यांना त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचा विसर पडला असावा.
अमित शहा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध
महामानव आंबेडकर यांच्या असामान्य कार्याचा आदर न करता, त्यांच्याबद्दल चुकीची विधाने करणाऱ्या अमित शहा यांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. त्यांच्या वक्तव्याने ब्राह्मणी मानसिकतेचा खरा चेहरा उघड झाला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा महाविद्वान, प्रगल्भ आणि दूरदृष्टी असलेला महामानव सात पिढ्यांतही जन्माला येऊ शकत नाही, हे कटू सत्य पचवता येत नसल्याने अशा प्रकारचा द्वेष व्यक्त केला जातो.
बाबासाहेबांना वाचले असते तर…
अमित शहा यांनी गोडसे, गोळवलकर आणि सावरकर यांच्या विचारसरणीतून थोडा वेळ काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचले असते, त्यांचे विचार समजून घेतले असते तर कदाचित असे वक्तव्य त्यांनी केले नसते. भारतीय घटनेच्या निर्मितीत बाबासाहेबांनी दिलेले योगदान, त्यांनी केलेला बहुजन आणि स्त्री मुक्तीचा लढा, आणि भारतीय समाजाला दिलेले नवे स्वातंत्र्य हे केवळ भारतापुरते मर्यादित नाही तर जागतिक कीर्तीचे आहे.
“बाबासाहेबांनी भारतीय जनतेला जिवंतपणीच स्वर्ग दिला!”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यवधी वंचित, शोषित, आणि दलित समाजाला सामाजिक न्याय दिला. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय जनतेला खऱ्या अर्थाने स्वर्गीय अनुभव दिला. हा इतिहास सूर्यप्रकाशाइतकाच स्पष्ट आहे.
ब्राह्मणी विचारसरणीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचार नेहमीच बोचत राहिले आहेत. मात्र, बाबासाहेब हे लाखो लोकांचे प्रेरणास्थान राहिले आहेत आणि राहतील.
बोधिसत्व, महामानव डॉ_बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो!
या आणि यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या “माझा आवाज” या न्यूज पोर्टलला भेट द्या आणि आमच्या इतर सोशल मिडिया हँडलना फॉलो करा
ब्राम्हणी नेणीव बाहेर आली…आंबेडकर आंबेडकर करतात यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्गात गेले असते…अमित शहा यांच वादग्रस्त वक्तव्य

mazaawaaz
Author
महत्वाच्या बातम्या
अजितदादांना बारामतीत शासकीय निरोप. 🥀
इम्रान खान यांना 17 वर्षांची शिक्षा ⚖️
🚨 जाफराबाद गोळीबार: दोन भावांचा मृत्यू 🔫
⚡ सावळज ग्रामपंचायतीत राजीनामा सत्र 🔥
🚨दिल्लीतील वाहन चोरीत ५२% झपाट्याने वाढ! 🚗
🙏 शीला दीक्षित यांना काँग्रेसची श्रद्धांजली 🌹
Stock market