Home » बातम्या » मोहित कंबोज विरुद्ध गजाभाऊ: सोशल मीडियावर नवा वाद, ट्विट वॉरने घेतले नवीन वळण

मोहित कंबोज विरुद्ध गजाभाऊ: सोशल मीडियावर नवा वाद, ट्विट वॉरने घेतले नवीन वळण

Facebook
X
WhatsApp
Telegram

 

माझं आवाज प्रतिनिधी

 

मुंबई: ९ डिसेंबर २०२४:

भाजप नेते मोहित कंबोज आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर गजाभाऊ यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. एका नवीन ट्विटमुळे हा वाद आणखी चिघळला आहे. गजाभाऊ यांनी ट्विट करून मोहित कंबोज यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

गजाभाऊ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे:  

“क्या गुंडा बनेगा रे तू @mohitkamboj_

धमकी दिलेले ट्वीट डिलीट करायला चालू केले.

पहिला unpin केलेस नंतर डिलीट करतोयस.

उचलून आणायचं राहिलं जे बोललास त्याच्यावर तरी ठाम रहा.”

या ट्विटने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवली आहे. याआधीही मोहित कंबोज यांनी गजाभाऊला थेट “उचलून आणण्याची” धमकी दिली होती, ज्याला गजाभाऊने सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.

वादाचा उगम: मोहित कंबोज यांनी सात दिवसांपूर्वी गजाभाऊ यांना धमकावले होते, की “कुठेही असला तरी उचलून आणणार.” त्याला उत्तर देताना गजाभाऊ म्हणाले होते, “येताना एकटा येऊ नको, बापाला घेऊन ये. मी वाट बघतोय.” या वादावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

गजाभाऊ, ज्यांच्याकडे 27 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत, हे नेहमीच भाजप आणि त्याच्या सहयोगी पक्षांवर टीका करत असतात. तर मोहित कंबोज हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

गजाभाऊने केलेल्या या नव्या ट्विटने वादाला नवे वळण दिले आहे. मोहित कंबोज यांनी धमकीचे ट्विट डिलीट केल्याचा आरोप करत गजाभाऊने कंबोज यांच्या ठामपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे कंबोज समर्थक आणि गजाभाऊ समर्थक यांच्यात सोशल मीडियावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.

सोशल मीडियावर वादाचे पडसाद:

– काही युजर्स गजाभाऊच्या समर्थनार्थ ट्वीट करत आहेत.

– “मराठी माणसाला धमकी देणाऱ्या परप्रांतीयाचा निषेध” अशी पोस्ट्स ट्रेंड होत आहेत.

– कंबोज समर्थक मात्र त्यांच्या बाजूने समर्थन देताना गजाभाऊला “भडकावणारा” म्हणत आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चा:

या प्रकरणाचा परिणाम भाजप आणि त्यांच्या विरोधकांवर पडत असल्याचे दिसत आहे. काही राजकीय नेत्यांनी देखील या वादावर आपली मतं व्यक्त केली आहेत.

गजाभाऊ कोण आहेत?

गजाभाऊ हे एक प्रखर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहेत. “जन्माने बॉक्सर, यांत्रिकी अभियंता, सांगलीकर” अशी त्यांची ओळख ट्विटर (आता एक्स) वर सांगितली गेली आहे. ते नेहमीच वादग्रस्त पोस्ट्समुळे चर्चेत असतात.

या वादामुळे सामाजिक आणि राजकीय पातळीवर महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होत आहे. मराठी अस्मिता, परप्रांतीयांचा दबाव आणि राजकीय वर्चस्व या विषयांवर नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे.

आपण याविषयी काय विचार करता? तुमचे मत कमेंट करून कळवा आणि अधिक बातम्यांसाठी माझा आवाज ला फॉलो करा.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!