दि. सावळज को-ऑप क्रेडिट सोसायटीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सावळज, दि. 13 डिसेंबर 2024:
दि. सावळज को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., सावळज या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन राजूभाऊ सावंत यांनी संस्थेच्या तीन वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला आणि सभासदांसमोर आर्थिक कामगिरी सादर केली.
संस्थेची आर्थिक प्रगती
संस्थेने केवळ तीन वर्षांत उल्लेखनीय प्रगती करत ७ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे आणि ५.४० कोटी रुपयांच्या ठेवी आणि ५.२० कोटीचे कर्ज वाटप यशस्वीपणे पूर्ण केले आहे. दि. सावळज को-ऑप क्रेडिट सोसायटी ही पहिल्या वर्षापासून सभासदांना लाभांश वितरित करणारी तालुक्यातील एकमेव पतसंस्था ठरली आहे.
या वर्धापन दिन कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला. प्रमुख पाहुण्यांमध्ये संस्थेचे व्हा. चेअरमन ओमन (तात्या) पाटील, माजी उपसरपंच बाळासाहेब पोळ, शिवशक्ती कोल्ड स्टोरेजचे संचालक रावसाहेब दादा कांबळे, तासगाव सुतगिरणीचे संचालक शिदगोंडा बापू पाटील, प्रकाश (पीडी) पाटील, महावीर धेंडे, जेष्ठ संचालक शिवाजी काका जाधव, सिध्दनाथ जाधव, विनायकराव पाटील, अमोल पोळ, ग्रामपंचायत सदस्य अविनाश म्हेत्रे, विनोद कोळी, भोला कांबळे, विजय चव्हाण, आबा कांबळे, दत्तात्रय बापू पवार, संभाजी पाटील, गुलशन भडके, विश्वास निकम, अविनाश हंकारे, राजगोंडा पाटील, काशिनाथ भडके, सुनील मोहिते आणि बबलू घाटगे यांचा समावेश होता.
भविष्याची दिशा
राजूभाऊ सावंत यांनी संस्थेच्या आगामी योजना, उद्दिष्टे आणि नवनवीन संधींबाबत माहिती दिली. संस्थेच्या प्रगतीमध्ये सभासदांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि भविष्यातही सभासदांच्या सहभागातून संस्थेची प्रगती अधिक गतीमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संचालक, कर्मचारी आणि सभासदांनी विशेष प्रयत्न केले. दि. सावळज को-ऑप क्रेडिट सोसायटीची यशस्वी वाटचाल भविष्यातही अशीच सुरु राहील, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
– माझा आवाज प्रतिनिधी सावळज.









