Home » Uncategorized » अंजनीचे सरपंच प्रमोद शिंत्रे यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार २०२५’ जाहीर: ग्रामस्थांकडून भव्य सत्कार

अंजनीचे सरपंच प्रमोद शिंत्रे यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार २०२५’ जाहीर: ग्रामस्थांकडून भव्य सत्कार

Facebook
X
WhatsApp
Telegram

अंजनीचे सरपंच प्रमोद शिंत्रे यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार २०२५’ जाहीर: ग्रामस्थांकडून भव्य सत्कार

माझा आवाज विशेष प्रतिनिधी 

दि. १ जून २०२५ ~ तासगाव (प्रतिनिधी):अंजनी (ता. तासगाव, जि. सांगली) गावचे सरपंच श्री प्रमोद मधुकर शिंत्रे यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘आदर्श सरपंच पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. याबद्दल ग्रामपंचायत अंजनी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने नुकताच त्यांचा श्री अजित भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला उपसरपंच श्री योगेश पाटील, माजी उपसरपंच श्री शिवाजी दादा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री विठ्ठल पाटोळे, सदस्य श्री बाजीराव नाना पाटील, सदस्या सौ. जयश्री सुधाकर स्वामी, सौ. सुनिता रमेश पाटील, माजी सदस्य श्री संजय सावळे, आणि श्री निलेश पाटील उपस्थित होते. उपस्थितांनी श्री प्रमोद शिंत्रे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सरपंच प्रमोद शिंत्रे यांचा सत्कार मध्यवर्ती बँक चे संचालक मा. सुरेश भाऊ पाटील यांच्या हस्ते तसेच कवठे महाकाळ चे राष्ट्रवादी चे नेते तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती मा. दादासाहेब कोळेकर याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मा. संजय (आण्णा) गोरख पाटील ~ चेअरमन विकास सोसायटी, मा. विकास (भाऊ) हंबीरराव पाटील ~ चेअरमन वसंतदादा ग्रेप ग्रोव्हर्स सोसायटी, मा. नामदेव(बापू) पाटील, मा. ॲड. गजानन महाजन, मा. नंदकुमार शिंत्रे, मा. अनिल महाजन, मा. राजेंद्र शिंत्रे आणि इतर गावातील प्रतिष्ठित आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक विनायक कुलकर्णी, श्री नारायण पाटील श्री हनुमंत आप्पा चव्हाण, श्री विश्वनाथ पाटील (ड्रायव्हर), श्री. गणपती आवटे यांच्याकडून सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात.

तसेच सावळज रोड वरील पाटील मळा येथे मा. प्रमोद शिंत्रे यांचा सत्कार अंजनी विकास सोसायटी चेअरमन मा. संजय (आण्णा) गोरख पाटील याच्या हस्ते तसेच वसंत दादा ग्रेप ग्रोव्हर्स सोसायटी चे चेअरमन मा. विकास (भाऊ) हंबीरराव पाटील तसेच मा. गजानन शंकर पाटील, मा. माजी सरपंच रविंद्र (आण्णा) आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मा. रफिक मुलानी, मा. गजानन शंकर पाटील, मा. बजरंग (बली) पाटील, मा. दीपक (नाना) बबन पाटील, मा. नीलेश माणिक पाटील, मा. धीरज माणिक(मेजर) पाटील, मा. संग्राम बळवंत पाटील, मा. रणजीत रवींद्र पाटील, मा. गजानन शंकर पाटील, मा. माजी सरपंच रविंद्र (आण्णा कोळी, सौरभ विकास पाटील यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला.

विकासकामांचा झंझावात:
सरपंच प्रमोद शिंत्रे यांनी आपल्या गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात अंजनी गावात विविध विकासकामे यशस्वीरीत्या राबवली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने सुमारे ३१ विकासकामांना मूर्त स्वरूप दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने गावठाण अंतर्गत गटार बांधकाम, मॉडेल स्कूलची दुरुस्ती, हनुमान मंदिर देवालय बांधकाम, विविध ठिकाणी डांबरीकरण, नवीन अंगणवाडी इमारतींची उभारणी, सौर ऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी विकास व सुशोभीकरण, तसेच पाझर तलावाची दुरुस्ती अशा अनेक महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. या विकासकामांसाठी आमदार फंड, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत स्वनिधी, २२१५ योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग, जनसुविधा, जिल्हा वार्षिक योजना, आणि जलसंधारण विभाग अशा विविध शासकीय योजनांमधून निधी उपलब्ध करण्यात आला. त्यासाठी त्यांना माजी आमदार सुमनताई आर आर आबा पाटील तसेच राज्याचे लोकप्रिय युवा आमदार रोहित (दादा) आर आर पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

कामांची प्रमुख यादी:

१. गावठाण अंतर्गत गटार आणि डांबरीकरण (रु. १० लक्ष + रु. १० लक्ष)

२. मॉडेल स्कूल शाळा दुरुस्ती आणि नवीन वर्गखोल्या बांधकाम (रु. १७ लक्ष + रु. १८ लक्ष)

३. हनुमान मंदिर बांधकाम व सभामंडप (रु. ६५ लक्ष + रु. १० लक्ष)

४. दोन नवीन अंगणवाडी इमारती (प्रत्येकी रु. १० लक्ष)
* सौर ऊर्जा आधारित पाणीपुरवठा योजना (रु. १६ लक्ष + रु. १४ लक्ष)

५. स्मशानभूमी विकास कामे (रस्ता काँक्रिटीकरण, पत्रा शेड, वृक्षतोड – रु. ५ लक्ष + रु. ४ लक्ष + रु. २ लक्ष)

६. पाझर तलाव दुरुस्ती (रु. ५२ लक्ष)

७. विविध रस्ते खडीकरण, डांबरीकरण व काँक्रिटीकरण (अनेक कामे, उदा. अंजनी वडगाव रस्ता ते डोंगरसोनी रस्ता डांबरीकरण रु. १० लक्ष)

अंजनीचे सरपंच प्रमोद शिंदे यांच्याशी बोलताना त्यांनी हे सांगितलं की ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक चे संचालक आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश (भाऊ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहेत. अंजनीचे सरपंच प्रमोद शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली अंजनी ग्रामपंचायत वरील सर्व भरीव विकास कामे पूर्ण करून अंजनी गावच्या वैभवात आणि विकासात बहुमूल्य भर टाकली आहे.
श्री प्रमोद शिंत्रे यांच्या दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे अंजनी गावाने विकासाच्या दिशेने भरीव वाटचाल केली आहे. ‘आदर्श सरपंच पुरस्कार २०२५’ हा त्यांच्या याच कार्याचा गौरव असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

💐💐 अभिनंदन सरपंच प्रमोद शिंत्रे! 💐💐

अशाच ताज्या घडामोडींसाठी ‘माझा आवाज’ या वृत्तसंकेतस्थळाला (www.MazaAwaaz.com) नियमित भेट द्या. आमच्या टीमकडून तुम्हाला नेहमीच अचूक आणि उपयुक्त माहिती मिळेल. तसेच, आमच्या YouTube (http://www.youtube.com/mazaawaaz), Instagram (http://www.instagram.com/mazaawaaz), Twitter (X) (http://www.twitter.com/mazaawaaz), Facebook (http://www.facebook.com/mazaawaaz) आणि LinkedIn (http://www.linkedin.com/company/mazaawaaz) या सोशल मीडिया हँडल्सना अवश्य फॉलो करा.

“इन्स्टा इन्फ्लुएन्सर अटक: ‘ऑपरेशन सिंदूर’” ‹ Maza Awaaz — WordPress

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!