माझा आवाज प्रतिनिधी
भडगाव मायंबा: शिक्षणासाठी करमाफी
भडगाव मायंबा ग्रा.पं.चा कौतुकास्पद उपक्रम
रुईखेड मायंबाः परिसरातील भडगाव मायंबा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला,
त्यांचे पालकांना ग्रामपंचायतकडून घेतला जाणारा पाणीपट्टी आणि घरपट्टी कर माफ करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार दि.२४ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांच्या वतीने एकमताने ठराव मंजूर केला गेला आहे.
यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे वाढत्या शैक्षणिक स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे भवितव्य टिकवून ठेवणे आणि गावकऱ्यांमध्ये शाळेबाबत जाणीव निर्माण करणे हा आहे.
या उपक्रमाद्वारे सरकारी शाळेची ओढ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
ग्रामसभेत हनुमान पालकर यांनी हा ठराव वाचून दाखवला, तर राहुल साखरे यांनी त्याला अनुमोदन दिले.
या बैठकीचे अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच अनुसया खडके होते.
२४ मे रोजी आयोजित ग्रामसभेत निर्णय घेण्यात आला.
66
सरकारी शाळेचे भवितव्य टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.
या निर्णयामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अधिक बळकट होऊन गावकऱ्यांमध्ये शिक्षणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
-अनुसया खडके, सरपंच
प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच प्रवीण इंगळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल साखरे, शंकर मगर, विजय साखरे, शरद पालकर, धनंजय साखरे, गौतम भटकर, किशोर इंगळे, सुभाष पाटील, गणेश पाटील, सुधाकर पालकर, भगवान शेळके, भागवत साखरे, वैभव ताडे, रमेश इंगोले, नऊ साखरे, गुलाबराव जाधव, विठ्ठल खडके, अशोक साखरे, संजय साखरे, दीपक खडके, गणेश तायडे, अनिल भटकर, करण मगर, शंकर इच्छित, योगेश इरशीत, रामकृष्ण इंगळे आणि संजय इंगळे उपस्थित होते.
अशाच ताज्या घडामोडींसाठी ‘माझा आवाज’ या वृत्तसंकेतस्थळाला (www.MazaAwaaz.com) नियमित भेट द्या. आमच्या टीमकडून तुम्हाला नेहमीच अचूक आणि उपयुक्त माहिती मिळेल. तसेच, आमच्या YouTube (http://www.youtube.com/mazaawaaz), Instagram (http://www.instagram.com/mazaawaaz), Twitter (X) (http://www.twitter.com/mazaawaaz), Facebook (http://www.facebook.com/mazaawaaz) आणि LinkedIn (http://www.linkedin.com/company/mazaawaaz) या सोशल मीडिया हँडल्सना अवश्य फॉलो करा.
स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर तासगाव : १०वी निकालात दैदिप्यमान यश! – Maza Awaaz









