मुंबई, १४ मे २०२५ – गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. विशेषतः फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात आंबा, केळी, पपई आणि इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी फळे गळून गेली आहेत. काढणीला आलेली फळे खराब झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
या अवकाळी पावसामळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अनेकांनी यासाठी बँकेतून कर्ज घेतले होते. आता पिके खराब झाल्याने हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत शेतकरी आहेत. शासनाने तातडीने या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मदत पुरवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यातील कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नुकसानीचा आकडा मोठा असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सोशल मीडियावर व्यक्त केल्या असून, मदतीसाठी सरकारकडे आर्त हाक मारली आहे.
अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी वाचत राहा ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टल आणि फॉलो करा आमचे युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटर यांसारखे सोशल मीडिया हँडल्स.










