Home » राजकारण » माझा आवाजचा अंदाज खरा ठरला: पालकमंत्री नियुक्तीवरून महायुतीत बेबनाव, एकनाथ शिंदे प्रचंड नाराज…

माझा आवाजचा अंदाज खरा ठरला: पालकमंत्री नियुक्तीवरून महायुतीत बेबनाव, एकनाथ शिंदे प्रचंड नाराज…

Facebook
X
WhatsApp
Telegram

माझा आवाजचा अंदाज खरा ठरला: पालकमंत्री नियुक्तीवरून महायुतीत बेबनाव, एकनाथ शिंदे प्रचंड नाराजरायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर स्थगिती

माझा आवाज विशेष प्रतिनिधी

मुंबई, 20 जानेवारी 2025

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून महायुतीतील बेबनाव उघड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काल-परवा ‘माझा आवाज’ ने महायुतीतील नाराजी आणि संभाव्य तणावाबाबत दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याच्या निर्णयामुळे महायुतीत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

रायगडसाठी अदिती तटकरे आणि नाशिकसाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मात्र, रायगडसाठी शिंदे गटाचे भरत गोगावले तर नाशिकमध्ये स्थानिक नेत्यांना डावलल्यामुळे नाराजी व्यक्त होत होती. परिणामी, ही नियुक्ती थांबवण्यात आली आहे.

शिंदेंची नाराजी उफाळून आली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रायगडसाठी आपल्याच गटातील नेत्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा ठेवून होते. मात्र, त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याने, एकनाथ शिंदे प्रचंड नाराज होऊन साताऱ्यातील दरे या त्यांच्या मूळगावी निघून गेले आहेत. या घटनेने महायुतीत तणाव अधिकच वाढला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे शिंदेंची मनधरणी करण्यासाठी तातडीने दरे गावी जाणार असल्याचे समजते.

‘माझा आवाज’ने अंदाज व्यक्त केला होता 
कालच ‘माझा आवाज’ने या विषयावर नाराजी आणि महायुतीतील तणावाची शक्यता वर्तवली होती, जी आजच्या घडामोडींमुळे सत्यात उतरली आहे. पालकमंत्री नियुक्तीवरून महायुतीत निर्माण झालेला बेबनाव राज्याच्या राजकारणात नवा वळण आणण्याची शक्यता आहे.

ताज्या राजकीय घडामोडी व अद्ययावत माहिती वाचण्यासाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला भेट द्या आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!